मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेता समोरील अडचणी अधिक वाढल्या आहेत. पर्लला वसई कोर्टाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याआधी पर्लची एक्स गर्लफ्रेंड आणि सहकलाकार करिश्मा तन्नाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पर्ललला जामीन मिळाला असल्याची बातमी शेअर केली होती. परंतु ताज्या वृत्तानुसार पर्लला जामीन नाही तर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पर्लला शुक्रवारी रात्री उशीराने अटक करण्यात आली. ही बातमी शनिवारी सकाळी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि मनोरंजन विश्वातील सर्वांनाच धक्का बसला. करिश्मा तन्नासह अनेक सेलिब्रिटिंनी पर्लला पाठिंबा दिला आहे. करिश्मा तन्नाने पर्लसोबत फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत लिहिले होते, ‘सत्यमेव जयते… खरेपणाचा नेहमीच विजय होतो आणि तो जिंकला आहे.’

करिश्माने हा फोटो शेअर करत त्यावर #gotbail असे टॅग केले होते.करिश्माच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींना पर्लला पाठिंबा दिला. त्यामध्ये रुचिका कपूर, मोहित कठुरिया, विकास कालांतरी, एकता कपूर, अनिता हसनंदानी सहीत अनेकांचा समावेश आहे. अनिता आणि एकता यांनी तर पर्लला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल्या आहेत.

अनिता हसनंदानीने लिहिले, ‘मी जेव्हा सकाळी उठले तेव्हा पर्लची बातमी ऐकली. ही बातमी अत्यंत खोटी आणि बिनबुडाची आहे. मी त्याला चांगली ओळखते. परंतु जे काही घडले आहे ते खरे असूच शकत नाही. हे काही तरी वेगळेच प्रकरण असणार आहे, याची मला खात्री आहे. लवकरच यामागील सत्य सर्वांसमोर येईल. लव यू पर्ल वी पुरी.’

निर्माती एकता कपूरने ही पर्लला पाठिंबा दिले आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर एक प्रदीर्घ पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले आहे की, ‘ पिडित मुलीच्या आईबरोबर माझे प्रदीर्घ बोलणे झाले आहे. तिने देखील याप्रकरणी पर्ल दोषी नसल्याचे सांगितले आहे. तिच्या आणि माझ्या संभाषणाच्या व्हॉईस नोट माझ्याकडे आहेत. पर्लवर माझा विश्वास आहे… ‘

पर्लवर बलात्काराचा आरोप

पर्ल वी पुरीवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच आरोप आहे. त्याला शुक्रवारी, ४ जून रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली. त्याआधी पिडीत मुलीने पोलिसांकडे तिचा जबाब नोंदवला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पर्लला ‘पोस्को’ कायद्या अंतर्गंत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here