सांगली: येथील एमआयडीसी परिसरात आज सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक कंपन्यांच्या इमारतींसह घरांचे पत्रे उडाले. भिंती पडल्याने काही इमारती जमीनदोस्त झाल्याने प्रचंड नुकसान झाले. ( )

वाचा:

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस धडक देत आहे. आज शिराळा तालुक्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने तारांबळ उडवली. आज दुपारी २ वाजल्यापासून काळे ढग दाटून आले होते. ४ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळी वारा व पावसाची तीव्रता इतकी जास्त होती की परिसरातील कंपन्यांच्या छतावरील पत्रे उडून जायला सुरुवात झाली. पत्रे उडाल्याने आणि झाडांची पडझड झाल्याने इमारतींसह वाहनांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.

वाचा:

एमआयडीसीत सहा कर्मचारी जखमी

काही कंपन्या मुळे बंद आहेत तर काही कंपन्या शासकीय नियमानुसार ठरवून दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार सुरू असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. उडून गेलेले पत्रे व पडलेले इमारतीचे काही भाग पाहिले असता या ढगफुटीची आणि वादळाची तीव्रता लक्षात येते. शिराळा एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या दोन महिला व चार पुरुष असे सहा जण जखमी झाले आहेत. वादळी पावसानंतर शहरातील सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर कंपन्यांचे मालक, व्यवस्थापकांनी एमआयडीसीमध्ये धाव घेत किती नुकसान झाले आहे याचा अंदाज घेण्याचे काम सुरू केले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here