नवी दिल्ली : ट्वेन्टी-२० विश्वचषक आता भारतात होऊ शकत नाही, हे जवळपास निश्चित होत आले आहे. या गोष्टीचा खुलासा आज आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. आयसीसीच्या अधिकाऱ्याने एक मोठे कारण सांगितले असून त्यामुळे आता ट्वेन्टी-२० विश्वचषक भारताबाहेर होऊ शकतो, हे जवळपास निश्चित समजले जात आहे.

बीसीसीआयने आता कितीही प्रयत्न केला तरी ट्वेन्टी-२० विश्वचषक आता भारतात होऊ शकत नाही, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या बाबतची अधिकृत घोषणा काही दिवसांमध्येच होण्याची शक्यता आहे. पण भारतामध्ये विश्वचषक का होऊ शकत नाही, याचे मुख्य कारण आता आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

आयसीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ” विश्वचषकाच्या आयोजन करण्याच्या निर्णयासाठी अजून थोडा जास्त वेळ द्यावा, अशी मागणी बीसीसीआयने आयीसीला केली होती. पण आयसीसीमधील अन्य देशांनी या गोष्टीला विरोध केला. त्यामुळे भारताला मुदत वाढ देण्यात आली नाही. पण जर यजमानपद भारताकडे राहणार असेल तर त्यांना अन्यत्र स्पर्धा खेळवण्यात कोणतीही समस्या जाणवत नसल्याचेही पुढे आले आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे परदेशी खेळाडू आता भारतामध्ये खेळायला घाबरतील. कारण आयपीएलच्या बाबतीत जे काही घडले त्यानंतर परदेशी खेळाडूंनी भारताचा धसका घेतला आहे.”

भारतामध्ये सध्याच्या घडीला करोनाचे भीषण वातावरण आहे आणि या वातावरणात ट्वेन्टी-२० विश्वचषक होऊ शकतो, असे दिसत नाही. त्यामुळे आयीसीसीने आता ओमान या देशाशी संपर्क साधला आहे. ओमानची राजधानी असलेल्या मस्कतमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे काही सामने होऊ शकतात, असे आता पुढे येत आहे. त्यामुळे आता विश्वचषकाचे सामने मस्कतमध्ये होऊ शकतात. ओमान क्रिकेट संघटनेचे सचिन मधु जेसरानी यांनी आयएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ” आयसीसीने ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी आमच्याबरोबर संपर्क साधला आहे. त्याचबरोबर आमच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष पंकज खिमजी हे बीसीसीआयबरोबर चर्चा करत आहे. ही चर्चा सकारात्मकपणे होत आहे.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here