मुंबई: क्रिकेट सामन्यात अनेकदा एखाद्या चूकीची संघाला मोठी किमत मोजावी लागले. अशाच चुकीमुळे सामने गमावल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. मैदानावर खेळाडूकडून कॅच सोडले जातात किंवा क्षेत्ररक्षणात चूका होतात. कधी कधी गोलंदाजांकडून नो बॉल टाकला जातो आणि त्या चेंडूवरच नेमका कॅच घेतला जातो किंवा फलंदाज बोल्ड होतो. क्रिकेटच्या इतिहासात अशाच एका नो बॉलने प्रतिस्पर्धा संघाला मोठी किमत मोजावी लागली.

वाचा-

वेस्ट इंडिजचा खेळाडू ब्रायन चार्ल्स लारा याला क्रिकेटमधील प्रिंस म्हटले जाते. लाराच्या नावावर क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आहेत. जगातील दिग्गज गोलंदाजांमध्ये समावेश असलेल्या ग्लेन मॅग्रा, शेन वॉर्न, वासीम आकरम या सर्वांनी लाराला सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले आहे. आजच्या दिवशी ६ जून रोजी २७ वर्षापूर्वी लाराने असाच एक विक्रम केला होतो.

वाचा-

लाराने दोन वेळा क्रिकेट कसोटीमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने सर्व प्रथम गारफील्ड सोबर्सच्या ३६५ धावांचा विक्रम मोडला होता. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनच्या ३८० धावांचा विक्रम मागे टाकत लाराने ४०० धावांचा विक्रम केला. पण आज लाराच्या एका वेगळ्या विक्रमाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा विक्रम त्याने भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला नसला तरी क्रिकेटच्या इतिहासात त्याची नोंद सुवर्णअक्षरात केली गेली आहे.

१९९४ साली आजच्या दिवशी लाराने प्रथम श्रेणीमध्ये सर्वाधिक धावाचा विक्रम केला होता. त्याच्या आधी कोणीच अशी कामगिरी केली नव्हती. काउंटी क्रिकेटमध्ये वॉरविकशरकडून खेळताना लाराने डरहमविरुद्ध ५०० धावांचा विक्रम केला होता. त्याने पाकिस्तानचा हनीफ मोहम्मदच्या ४९९ धावांचा विक्रम मागे टाकला.

वाचा-
आता…

डरहमविरुद्धच्या सामन्यात लारा १२ धावांवर बोल्ड झाला होता. पण तो चेंडू नो बॉल होता. त्यानंतर पुन्हा एकदा १८ धावांवर असताना विकेटकीपर ख्रिस स्कॉटने त्याचा कॅच सोडला. हा कॅच सोडल्यानंतर स्कॉट म्हणाला, हा तर आता शतक करणार. पण लारा काही शतक करून थांबला नाही. शतकानंतर द्विशतक, त्रिशतक आणि मग ४०० आणि ५०० धावा केल्या. या सामन्या त्याने ४२७ चेंडूत ६२ चौकार आणि १० षटकार मारले.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १००, २००, ३००, ४०० आणि ५०० अशा धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. अन्य कोणत्याही फलंदाजाने अशी कामगिरी केली नाही. आणि भविष्यात अशी कामगिरी होईल की नाही याबाबत मोठा प्रश्नच आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here