पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, कोव्हॅक्सिनच्या लशीसाठी या वयोगटामध्ये चाचण्या करण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे. मात्र, अद्याप संबधित कंपनीकडून प्रतिसाद मिळालेला नाही. हा प्रतिसाद मिळाल्यानंतर यासंदर्भातील पुढील प्रक्रिया सुरू होईल.
या वयोगटामध्ये लसीकरणासाठी आपण उत्सुक असल्याचे अनेक कंपन्यांनी पालिका प्रशासनाला कळवले आहे.तसेच चाचण्यांसंदर्भात विचारणाही केली आहे. मुलांच्या चाचण्या करण्याची तयारी दर्शवताना, दोन वैद्यकीय महाविद्यालयांची नावेही देण्यात आली आहेत. संमती मिळाल्यास ‘आयसीएमआर’च्या नियमावलीनुसार या चाचण्याकरण्यात येणार आहेत. येत्या दोन आठवड्यामध्ये यासंदर्भात स्पष्टता येण्याची शक्यता वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने बालरोगतज्ज्ञ, तसेच फिजिशिअन यांनाही मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम आखला आहे.२४ प्रभागांमधील बालरोगतज्ज्ञांना या अंतर्गत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. झोपडपट्टी, सार्वजनिक जागा, सार्वजनिक शौचालयांच्या जागी विशेष स्वच्छता ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
६० टक्के मात्रा तीन देशांना
संयुक्त राष्ट्रे : आजपर्यंत जगभरात वितरित झालेल्या करोनाच्या दोन अब्ज लसमात्रांपैकी ६० टक्के मात्रा भारत, अमेरिका आणि चीन या तीन देशांमध्ये वितरित झाल्या असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेतील (डब्ल्यूएचओ) वरिष्ठ सल्लागाराने दिली. ‘डब्ल्यूएचओ’चे महासंचालक टेड्रॉस अॅढॅनॉम घेब्रेयेसस यांचे वरिष्ठ सल्लागार ब्रुस आयलवर्ड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही आकडेवारी मांडली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times