१४ व्या वर्षीपासून फिटनेस फ्रीक
वयाच्या १४ व्या वर्षीपासून सिद्धार्थला व्यायामाचं वेड आहे. सुरुवातीला जेव्हा वजन थोडं नियंत्रणात येऊन तो फिट दिसू लागला तेव्हापासून तो नियमितपणे एक्सरसाईज करतोय.
रोज दोन तास जिम
शाळा-कॉलेजच्या दिवसात सिद्धार्थला खेळात रस होता. आजही तो दिवसाला दोन तास व्यायाम करतोच. त्यासाठी तो पहाटे ५.३० वाजता उठतो आणि ६ वाजता जीम गाठतो.
एक्सरसाईजच्या सिक्रेट टीप्स
सिद्धार्थ सांगतो की तो आठवड्यातले सहा दिवस जिम करतो. दर दिवशी शरीराच्या दोन भागांवर लक्ष केंद्रित करून त्यानुसार तो व्यायाम करतो.
नवे प्रकार
सिद्धार्थचं म्हणणं आहे की जेव्हा तो डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की डान्समुळे एका दिवसात खूप कॅलरीज् बर्न होतात. त्यामुळे ज्या लोकांना एक्सरसाइज आणि योग करणं बोअरिंग वाटतं, त्यांना डान्स क्लास करूनही वजन घटवता येईल, असं तो म्हणतो.
डाएट प्लान
सिद्धार्थ दिवसाची सुरुवात कार्बोहायड्रेट्सपासून करतो. नाश्त्याला तो ओट्स, प्रोटिन शेक किंवा अंडी खातो. दुपारच्या जेवणात फक्त आणि फक्त भारतीय पदार्थ – वरण, भाजी आणि चपाती. संध्याकाळी बार्लीपासून बनवलेली चपाती किंवा अंडं. रात्रीच्या जेवणातही प्रोटीन बेस्ड डाएट तो घेतो.
कधी कधी चिटींगही
सिद्धार्थला जंक फूड आवडतं. तो क्वचित कधीकधी जंक फूड खातोही, पण शक्यतोवर तेलकट, प्रोसेस्ड अन्न खात नाही. जिभेवर नियंत्रण ठेवतो.
शिक्षाही देतो
ज्या दिवशी तो जंक फूड खातो, तेव्हा एक्स्ट्रा कॅलरीज बर्न करण्यासाठी स्वत:ला शिक्षाही करतो. त्या दिवशी तो त्याच्या अपार्टमेंटची लिफ्ट न वापरता, जिने चढून जातो.
शरीराचा आदर करा
सिद्धार्थ आपल्या यंग फॅन्सना सल्ला देतो की आपल्या शरीराचा आदर करा. पैसे कमावण्याच्याच नादात, शरीराकडे दुर्लक्ष करून आजारी पडू नका, अन्यथा पैसे कमावूनही ते तुम्ही एन्जॉय करु शकणार नाही. चालणं, धावणं, व्यायाम करणं जरुरी आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times