अनुसूचित जाती विभागाच्या सर्व राज्यांचे प्रमुख व राष्ट्रीय प्रभारींच्या कामाचा आढावा डॉ. नितीन राऊत यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला. यावेळी बोलताना डॉ. राऊत म्हणाले, कोरोनाच्या संकटातून आपण सर्वजण जात असताना येत्या काही महिन्यात आठ राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुद्धा होणार आहे. या निवडणुका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यात उत्तरप्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश व पंजाब या राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये काँग्रेसला अधिकाधिक यश मिळवून देण्यासाठी अनुसूचित जाती विभागाला अधिक कार्यक्षम होण्याची आवश्यकता आहे.
विविध राज्यांच्या काँग्रेस प्रदेश समितीकडून आता अनुसूचित जाती विभागाच्या कार्यकर्त्यांना पुरेसे प्रतिनिधीत्व व प्रदेश समितीच्या निर्णयप्रक्रियेत सामावून घेत असल्याचे अनेक प्रतिनिधींनी सांगितले. हे चांगले संकेत असून पुढील काळात यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी विधानसभेच्या काँग्रेस गटनेतेपदी तामीळनाडू अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सेल्वापुरूथगाई यांची नियुक्ती केली आहे. ही अनुसूचित जाती विभागाच्या कामाला मिळालेली पावती असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
या ऑनलाईन बैठकीचे संचालन अनूसूचित जाती विभागाचे महासचिव चंद्रसेन राव यांनी केले. या ऑनलाईन बैठकीत उपाध्यक्ष ब्रिजलाल खाबरी, राजस्थान व छत्तीसगड राज्याचे प्रभारी राजाभाऊ करवाडे, गुजरात राज्याचे प्रभारी अनिल नगरारे यांच्यासह मनोज बागडी, राजकुमार कटारिया, तरुण वाघेला, सतीश बंधू, राजेशकुमार, सुरेशकुमार, रितू चौधरी, गोपाल डेनवाल, धनेश पटीला, क्षितीज अड्याळकर, धर्मवीर, आलोक प्रसाद आदींनी सहभाग घेतला.
क्लिक करा आणि वाचा-
या बैठकीत राज्यांच्या प्रमुखांनी कोरोना काळात सुरू असलेल्या सामाजिक कामाची माहिती दिली. तसेच प्रभारींनी संबंधित राज्यांच्या कामाचा आढावा सादर केला.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times