आजच्या २३३ मृत्यूच्या आकड्याबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५५ लाख ४३ हजार २६७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाखांच्या खाली
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ८५ हजार ५२७ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी तीत घट होताना दिसत आहे ही दिलासादायक बाब आहे. पुण्यात एकूण २१ हजार २१६ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार ०४१ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १६ हजार ६७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ७३४ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ९ हजार २४४ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ८९१ इतकी आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times