उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार ( ) आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आमदारांचे रिपोर्ट कार्ड तयारत आहे. कामगिरीच्या आधारावरच निवडणुकीची उमेदवारी दिला जाईल, असं बैठकीशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त आजतक या वृत्तवाहिनीने दिलं आहे. उत्तर प्रदेशात करोना रुग्णांची वाढती संख्या आणि गंगा नदीत वाहत्या मृतदेहांच्या वृत्तांनंतर योगी सरकारवर जोरदार टीका केली जात होती.
अनेक दिवसांपासून बैठकांचा सिलसिला
यानंतर पंतप्रधा मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दोन महत्त्वाच्या बैठका झाल्या. यात यूपीतील सरकारच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली गेली. तसंच राज्य सरकारची प्रतीमा सुधारण्यासाठी काय करता येईल? याची योजनाही आखली गेली. यामुळे राज्य मंत्रिमंडळात फेरबदल आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. अनेक जुन्या मंत्र्यांना बाहेर करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असं बोललं जातं होतं.
यूपीत गेल्या काही दिवसांपासून बैठका सुरू आहेत. यात कॅबिनेटमधील बदलांसह निवडणूक प्रचारावरही चर्चा सुरू आहे. अलिकडेच पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सरचिटणीसांची दोन दिवस बैठक घेतली. यात उत्तर प्रदेशसह ५ राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीवर चर्चा केली गेली. यात बी. एल संतोष आणि यूपी भाजपचे प्रभारी राधा मोहन सिंह हे ही उपस्थित होते.
भाजपने रविवारी करोनाच्या दुसऱ्या लाटेदम्यान कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. येत्या काही दिवसांत भाजप देशभरात १ लाख व्हॉलिंटियर्स तयार करणार असल्याचं सांगण्यात आलं. वैद्यकीय उपकरणं हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. ही बैठक जे. पी. नड्डा यांनी बोलावली होती. यात पक्षाचे सरचिटणीस आणि वेगवेगळ्या संघटनांचे अध्यक्षही उपस्थित होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times