बीजिंग/नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील पॅन्गोंग सरोवर भागातील कडाक्याच्या थंडीत भारतीय सैनिकांशी दोन हात करण्यासाठी आलेल्या चिनी सैनिकांची खराब हवामानात अवस्था बिकट झाली. लडाख पूर्वमध्ये चीनने मोठ्या संख्येने आपले सैनिक तैनात केले होते. मात्र, लडाखमधील कडाक्याच्या थंडीसमोर चिनी सैनिकांनी हात टेकले आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवळपास ९० टक्के जवानांना माघारी बोलवण्यात आले. त्यांच्या ऐवजी दुसऱ्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने मागील एका वर्षात या ठिकाणी तैनात केलेले जवान बदलले आहेत. त्यांच्या ऐवजी नव्या जवानांना तैनात केले. या भागातील कडाक्याच्या थंडीमुळे चीनने ९० टक्के जवान बदलले आहेत.

वाचा:
माध्यमांच्या वृत्तानुसार, कडाक्याची थंडी आणि अन्य कारणांमुळे चीनने रोटेशन धोरणानुसार जवान बदलले आहेत. चिनी सैनिकांमध्ये इतकी कडाक्याची थंडी सहन करण्याची क्षमता नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पॅन्गोंग सरोवर भागात फ्रिक्शन पॉईंटवर तैनातीच्या दरम्यान अधिक उंचावर असणाऱ्या चौक्यांमधील चिनी सैनिक बदलले जात होते.

वाचा: भारतीय जवानांची काय स्थिती?

चीनच्या तुलनेत भारतीय जवान अधिक सक्षम असल्याचे दिसून आले. भारतीय लष्कर अधिक उंच असणाऱ्या भागामध्ये आपल्या जवानांना दोन वर्षाच्या कालावधीसाठी तैनात करतो. दरवर्षी भारतीय लष्कर आपल्या ४० ते ५० टक्के जवानांची पोस्टिंग अधिक उंच भागावर करते. अशा परिस्थितीत आयटीबीपी जवानांचा कार्यकाळ कधी-कधी दोन वर्षांहून अधिक असतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here