मुंबईः वांद्रे परिसरात एका इमारतीचा भाग कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रविवारी मध्यरात्री २च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. वांद्रे परिसरात बेहराम पाडा परिसरात रझाक चाळ आहे. ही इमारत चारमजली आहे. इमारतीचा काही भाग कोसळल्यानं तीन ते चार जण ढिगाऱ्याखाली अडकले गेले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केलं. पोलीस, रुग्णवाहिका आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी असून बचावकार्य हाती घेण्यात आलं होतं.
स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केलं. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर, ४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times