मुंबई: पंढरपूरच्या आषाढी वारीच्या मुद्द्यावरून सध्या भारतीय जनता पक्ष व सत्ताधारी महाविकास आघाडी आमनेसामने आली आहे. करोनाच्या संकटामुळे गर्दी टाळण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. त्यासाठी धार्मिक उत्सव व यात्रांवर घालण्यात आलेले निर्बंध तूर्त कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, भाजपनं त्यास आक्षेप घेतला आहे. आषाढी वारी पायी होऊ देण्याचा आग्रह भाजपनं धरला आहे. त्यावरून जोरदार शाब्दिक चकमकी सुरू आहेत. ( attacks BJP’s Spiritual Wing)

आषाढी वारी यंदा पायी होऊ द्यावी, असा आग्रह भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनं धरला आहे. ‘राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुघलांचे सरकार आहे. अनलॉकमध्ये सर्व गोष्टींना परवानगी दिली असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही. अनलॉकमध्ये मंदिरांचा समावेश करावा. यंदा पायी वारी झालीच पाहिजे, आम्ही तडजोड स्वीकारणार नाही,’ असा इशारा भाजपचे यांनी दिला आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते यांनी भाजपवर तोफ डागली आहे.

वाचा:

‘राजकारण व अध्यात्म हे परस्परविरोधी मार्ग आहेत. भाजपच्या अधर्माचा अध्यात्माशी संबंध काय? भाजपची अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. भोंगळवाद स्थापित करण्याचं काम भाजप करत आहे,’ असा आरोप सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. सावंत यांनी भोसले यांना ‘अनाचार्य’ असं संबोधलं आहे. ‘अनाचार्याच्या भाषेचा अध्यात्माशी दूरचाही संबंध नाही. धर्माच्या राजकारणासाठीचे हे थोतांड बंद करा,’ असं सावंत यांनी सुनावलं आहे.

मागील वर्षीच्या लॉकडाऊन काळातही मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक झाला होता. मात्र, करोनाच्या संकटामुळं राज्य सरकारनं सावध भूमिका घेतली होती. त्यावेळी भाजपनं राज्यभर घंटानाद आंदोलनही केलं होतं. आता पुन्हा वारी व मंदिरांच्या मुद्द्यावरून भाजपनं सरकारला घेरलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here