मुंबई: मागील आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात सुरू झालेला भेटीगाठींचा सिलसिला अद्याप सुरूच आहे. आता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ट्वीटर हँडलवर दोन्ही नेत्यांच्या भेटीचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. थोरात यांनी पवारांची सदिच्छा भेट घेतल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मात्र, या भेटीवरून पुन्हा एकदा वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत. (Revenue Minister Met NCP Chief )

वाचा:

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले असतानाच फडणवीस यांनी मागील आठवड्यात अचानक शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर फडणवीस थेट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी पोहोचले होते. फडणवीस यांच्या या भेटींमुळं चर्चा सुरू असतानाच, एकनाथ खडसे यांनी मुंबईतील निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली होती. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील यावेळी उपस्थित होते. त्यामुळं नेमकं काय चाललं आहे, याबाबत राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी या भेटी झाल्याचा खुलासा करण्यात आला होता. तरीही ही चर्चा थांबली नव्हती. त्यातच आता बाळासाहेब थोरात यांनी पवारांची भेट घेतली आहे.

वाचा:

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सध्या अनेक विषयांवरून कुरबुरी आहेत. निधी वाटपाविषयीची काँग्रेसची तक्रार जुनीच आहे. त्यातच पुढील विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. २०२४ साली राज्यात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीतील पक्षांच्या अशा आक्रमक भूमिकेमुळे राज्यात वेगळा संदेश जात आहे. या पार्श्वभूमीवर थोरात यांनी घेतलेली पवारांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here