मुंबईः राज्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध शिथिल करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. निर्बंध शिथिली करण्यासाठी पाच टप्पे तयार केले असून त्यातील नियमांनुसार जिल्ह्यांची वर्गवारी करुन निर्बंध उठवले जाणार आहेत. त्यात मुंबई तिसऱ्या गटात काही अंशी निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. यावरुन काँग्रेसचे नेते यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

संजय निरुपम यांनी एक ट्विट करत ठाकरे सरकारला सवाल केला आहे. ‘मुंबईत लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. पण, यामुळं लोकांना त्रास जास्त होणार आहे. कार्यालये उघडली जात आहेत, पण सार्वजनिक वाहतूक नाहीच. एकतर बसेची संख्या वाढवा किंवा काही प्रमाणात लोकल सुरु करण्यात यावी. लोक ऑफिसला कसे जाणार? वर्क फ्रॉम ऑफिसला एक मर्यादा आहे,’ असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.

वाचाः

एसटी सर्वांसाठी खुली
दरम्यान,’तिसऱ्या गटा’तील मुंबईत बसवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार १०० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात एसटीसेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई-ठाण्यातून रोज जवळपास ४०० गाड्या धावतात. या सर्वच गाड्यांतून सामान्यांना प्रवास करता येईल. लांब पल्ल्याच्या गाड्या ऑनलाइन आरक्षणासाठी उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू असून, निर्बंध शिथिल झालेल्या जिल्ह्यांसाठीसुद्धा लवकरच एसटीसेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक संजय सुपेकर यांनी दिली.

वाचाः

दर दहा मिनिटांनी मेट्रो

कडक निर्बंधात मोकळीक मिळाल्याने मेट्रो स्थानकांतील संभाव्य गर्दी टाळण्यासाठी मुंबई वन मेट्रो प्रशासन सज्ज झाले आहे. आज, सोमवारपासून दर १० मिनिटांनी मेट्रो फेऱ्या चालवण्याची घोषणा मेट्रोच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या फेऱ्यांमध्ये ३० टक्के वाढ होणार असल्याने सोमवारपासून रोज १३० फेऱ्या धावणार आहेत.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here