जेसीबीद्वारे भिंती तोडण्याचे काम सुरू
भीषण आग लागलेल्या या कंपनीत आणखी १७ कामगार अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी कंपनीच्या भिंती तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात येत आहे.
दरम्यान, मुळशीचे तहसीलदार अशोक धुमाळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. येथील एमआयडीसीतल अनेक छोट्यामोठ्या कंपन्या सुरू आहेत. या कंपन्यांमध्ये हजारो कामगार काम करतात.
क्लिक करा आणि वाचा-
नॅशनल केमिकल लॅबमध्येही आग
पाषाण रोड येथे असलेल्या नॅशनल केमिकल लॅबरॉटरीच्या (एनसीएल) मेन बिल्डिंगमधील लॅब नंबर १८० मध्ये आज दुपारी आग लागली होती. तेथील कर्मचाऱ्यांनी वेळीच अस्थाई अग्निशमन यंत्र फायर एक्स्टींगुईशेरचा वापर करून आग विझविण्याचे प्रयत्न चालू केले होते. पाषाण अग्निशमन केंद्राचे जवान वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने तेथील अनर्थ टाळला. तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने तेथे असलेली ज्वालाग्रही केमिकल्स तत्काळ बाजूला हटविण्यात आले. त्यामुळे मोठा धोका टळला.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times