वाचा:
पंतप्रधान मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. या संबोधनात देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे मोदी यांनी जाहीर केले. तसेच नोव्हेंबर महिन्यापर्यंत गरिबांना मोफत धान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संबोधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी प्रतिक्रिया दिली. साधारण रात्री ८ वाजता पंतप्रधान देशातील जनतेशी संबोधित करायचे. यावेळी मात्र त्यांनी वेळ बदलली. नव्या वेळेला ते लोकांशी संवाद साधण्यासाठी टीव्हीवर आले, अशी टोलेबाजी करत मलिक यांनी लसीकरणावर भाष्य केले.
वाचा:
१८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारने राज्य सरकारांवर ढकलली होती मात्र, आज केंद्र सरकार सर्व जबाबदारी घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. यामागेसुद्धा तीन कारणे आहेत, असे मलिक म्हणाले. लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद संसदेत करण्यात आली होती. तशी मान्यताही घेण्यात आली. शिवाय जी २५ टक्के लस उपलब्ध होती त्याची पूर्तताही केंद्राकडून होत नव्हती. राज्यांना ३०० ते ४०० रुपये दराने लस खरेदी करण्याचा परवाना देण्यात आला होता. मात्र, राज्यातील जनतेला लसपुरवठा वेळेवर होत नसल्याने प्रश्न उपस्थित होत होते. विशेष करून सुप्रीम कोर्टाने राज्य व केंद्रासाठी लसदर वेगवेगळे का? ३५ हजार कोटीची तरतूद करूनही पैसे का खर्च करत नाही, असा सवाल केंद्र सरकारला करत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते. केंद्र सरकारच्या प्रतिमेवर व निर्णयावर सुप्रीम कोर्टाने बोट ठेवल्याने सरकारचे अपयश व प्रतिमा सुधारण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जबाबदारी घेण्याची घोषणा केल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला.
लसीकरणाबाबत केंद्र सरकार भूमिका व निर्णय बदलत असल्याने त्यावर सातत्याने आम्ही बोट ठेवत ते योग्य नसल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देत होतो. आता सुरुवातीपासून असलेली जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली आहे. आता अपेक्षा आहे हे सर्व वेळेत मिळेल, असेही नवाब मलिक म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times