मुंबई: राज्यात दैनंदिन नव्या बाधित रुग्णांचा आकडा आणखी खाली घसरला असून दिवसभरात १० हजार २१९ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज निदान झालेल्या रुग्णांच्या संख्येहून दुपटीहून अधिकच आहे. आज एकूण २१ हजार ०८१ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडाही घसरला असून दिवसभरात १५४ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 10219 new cases in a day with 21081 patients recovered and 154 deaths today)

आजच्या १५४ मृत्यूच्या आकड्याबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५५ लाख ६४ हजार ३४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार ३२०

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार ३२० इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी तीत घट होताना दिसत आहे ही दिलासादायक बाब आहे. पुण्यात एकूण १९ हजार ६४५ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १७ हजार ५९१ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १६ हजार ६५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ५२० इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७ हजार ९७० इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ३२६ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच अहमदनगरमध्ये ७ हजार ०६१ इतकी आहे. औरंगाबादमध्ये २ हजार ३४९, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार ५८८ इतकी आहे. जळगावमध्ये ३ हजार ३०९, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार ७५५ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या २ हजार ९०२, तर, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गोंदिया जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ४४५ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-

१२,४७,०३३ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ६६ लाख ९६ हजार १३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८ लाख ४२ हजार (१५.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२ लाख ४७ हजार ०३३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ६ हजार २३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here