म. टा. प्रतिनिधी जळगाव

पाणीपुरवठामंत्री सुपारीचोर आहेत. ते सामाजिक किंवा विधायक काम करू शकत नाही. गुलाबराव एखादी युनिव्हर्सिटी किंवा स्पेस सायन्सचे सेंटर उघडणार नाही तर ते वाळूच चोरणार. त्यांची अक्कलच तेवढी आहे, अशा शब्दांत भाजपचे युवा नेते, माजी खासदार नीलेश राणेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर विखारी टीका केली. ( criticizes minister )

हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी जळगावात आलेले होते. भाजपच्या जिल्हा कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. जळगाव जिल्ह्यातील वाळू चोरीच्या मुद्द्यावरून निलेश राणेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला.

क्लिक करा आणि वाचा-
नीलेश राणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात जी वाळू चोरी सुरू आहे, ते कलेक्शन गुलाबराव पाटील यांच्यासाठीच सुरू असेल. वाळू चोरीचे हफ्ते स्थानिक आमदार आणि मंत्र्यांकडे पुरवले जातात. गुलाबराव हे आधी पानटपरी चालवायचे. तेच ना गुलाबराव. इथे पालकमंत्री आहेत सुपारीचोर. ती व्यक्ती सामाजिक किंवा विधायक काम करू शकत नाही. आता गुलाबराव काय युनिव्हर्सिटी आणणार, ते वाळूच चोरणार. यातले सगळे कलेक्शन त्यांच्याकडे जात असणार, असा आरोपही निलेश राणे यांनी यावेळी केला.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here