मुंबईः ‘भाजपप्रमाणे आम्हालाही विश्वासघात केल्याचं वाईट वाटतं. पण आम्ही विसरुन गेलो आहोत. त्यामुळं भाजपनंसुद्धा ते पत्र व शिवसेनेनं फसवलं यातून बाहेर पडलं पाहिजे,’ असा टोला शिवसेना खासदार यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र चोरून राज्यपालांना देणे हे नैतिक की अनैतिक, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केला होता. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा आरोप- प्रत्यारोप रंगले आहेत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातही भाजपवर टीका केली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.

‘ते पत्र चोरल्याचा आरोप भाजपनं केला आहे. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तेव्हाच भाजपनं जुनी जळमटं काढून फेफूनन द्यायला हवी होती. पण भाजपचे नेते अजून त्यात अडकून पडले आहे. त्यांच्या मनाला हा विषय फार लागला आहे. चोरीचा माल विकत घेणं हा सुद्धा गुन्हा आहे. एखाद्या नेत्याने शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरलं असेल तर त्या त्याच्या आधारे सरकार स्थापन करणं आणि चोरीचा माल विकत घेणं हा फार मोठा गुन्हा आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपनं शिवसेनेनं विश्वासघात केला असल्याची टीका केली होती. त्यावर उत्तर देताना संजय राऊतांनी आम्हालाही विश्वासघात केल्याचं वाईट वाटतं, असं म्हणत भाजपवर पलटवार केला आहे. ‘उद्धव ठाकरेंना भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेना प्रमुखांच्या खोलीत मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता असं उद्धव ठाकरे म्हणतात. तो शब्द पाळला गेला नाही हा विश्वासघात असून अनैतिक आहे. ती वेदना आजही टोचत आहे. दिलेला शब्द पाळण्याची आपली परंपरा आहे. पण आम्ही विसरुन गेलो आहे. त्यामुळे भाजपानेसुद्धा पत्र, शिवसेनेने फसलं यातून बाहेर पडलं पाहिजे आणि एक विरोधी पक्ष म्हणून खंबीर नेतृत्व उभं करुन काम केलं पाहिजे,’ असं राऊत म्हणाले आहेत.

पंतप्रधानांच्या बैठकीत तोडगा निघेलः राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीआधी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबाबत चर्चा रंगली असतानाच संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ‘शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना भेटणार आहेत त्यासंबंधी यावेळी चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच, मराठा आरक्षणासंदर्भात यांनी वेळ मागताच पंतप्रधानांनी तात्काळ दिली असून या बैठकीत तोडगा निघेल,’ असा विश्वास व्यक्त केला आहे.

‘महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याला मराठा आरक्षणाचा विषय ताणला जाऊ नये असं वाटत आहे. मराठा, ओबीसी असे अनेक विषय असून प्रत्येकाने आपल्या प्रश्नासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसं झाल्यास महाराष्ट्रात वातावरण गढूळ होईल, तणाव निर्माण होईल. कोर्टाच्या आदेशानंतर मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या अख्त्यारीत गेला आहे. त्यामुळे केंद्राच्या दरबारात हा विषय मांडणं हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here