दिंडोरी: आई व मावशी या दोन्ही नात्यांना काळिमा फासणारी घटना दिंडोरी तालुक्यातील पाडे येथे घडली असून मूकबधिर मुलाला सावत्र आई असलेल्या मावशीने मुलाच्या गुप्तांगावर चटके देत अमानुष अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

सदर बालकावर नाशिकला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दिंडोरी पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाडे येथील तीन वर्षीय मतिमंद बालकास त्याच्या सावत्र आईने अमानुषपणे मारहाण केली आहे. बालकाच्या अंगावर अनेक ठिकाणी चटके देत अत्याचार केले आहेत. ही घटना काही नागरिकांना समजताच त्यांनी त्या लहान मुलाला दिंडोरी येथे उपचारासाठी नेले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढे अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

वाचाः

सदर सावत्र आई ही त्या बाळाची मावशी आहे. कौटुंबिक कलहातून सोडून गेलेल्या आईनंतर सावत्र आई ही मावशी असल्याने तिची माया मिळेल ही आशा फोल ठरत नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने संताप व्यक्त होत आहे दिंडोरी पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली असून पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कलपेशकुमार चव्हाण करत आहे.

वाचाः

सावत्र आईची बाजू

या घटनेनंतर सावत्र आईच मुलाला घेऊन रुग्णालयात आली. मुलाला चटके दिल्याचा आरोप तिने फेटाळला आहे. हा लहानगा आणि त्याच्या मोठ्या भावामध्ये भांडण झालं त्यातून ही घटना घडली आहे, असं दावा तिने केला आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here