म. टा. प्रतिनिधी, जळगाव: कृषी पंपांच्या वीज बिलांच्या सक्तीने होणाऱ्या वसुली विरोधात भडगाव-पाचोरा तालुक्यात शिवसेनेकडून सोमवारी (दि.७) टाळे ठोको आंदोलन करण्यात आले होते. भडगावात हे आंदोलन झाल्यानंतर अज्ञात ७ जणांनी उपकार्यकारी अभियंत्याला मारहाण केली. यात हल्लेखोरांनी वायरमनलाही धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यात जमिनीवर पडल्याने झाला. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन प्रताप राणे (वय ४८, रा. जळगाव) असे या घटनेतील मृत वायरमनचे नाव आहे.

काल सोमवारी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव व पाचोरा तालुक्यात महावितरणच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सर्वत्र हे आंदोलन शांततेत पार पडले. परंतु, भडगाव येथे चाळीसगाव रस्त्यावरील कार्यालयात दुपारी १ वाजेच्या सुमारास अज्ञात ७ जण आले. त्यांनी उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना मारहाण करत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. यावेळी हल्लेखोरांच्या तावडीतून धामोरे यांना सोडवण्यासाठी गेलेले गजानन राणे यांनाही मारहाण झाली. त्यात ते जमिनीवर पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. राणे हे महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. ते भडगाव तालुक्यातील कोठली याठिकाणी नियुक्तीला होते.

सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या घटनेप्रकरणी रात्री उशिरा उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांनी भडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात ७ जणांविरुद्ध राणे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजवरुन हल्लेखोरांचा तपास करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here