पाण्याच्या वादातून आपल्या वृद्ध पत्नीला जाब विचारत असताना चिकणकरनं लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या वेळी ही वृद्ध महिला वारंवार हात जोडून मला मारु नका, अशी विनंती करत होती. मात्र तिचं काहीही ऐकून न घेता चिकणकर बुवा तिला सातत्याने मारहाण करत होता. वृद्धेला मारहाण होत असताना घरात काम करत असलेल्या इतर स्त्रियांनीही त्यावेळी आवाज उठवला नाही. कोणी मध्यस्थीसाठीही आलं नाही. या वृद्धेच्या नातवानं हा व्हिडिओ काढला असून तो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला.
वाचाः
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी चिकणकर बुवावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पोलिसांनीही घटनेची दखल घेत चिकणकर बुवाच्या घरी पोहोचले होतो. मात्र, तेव्हा बुवा आळंदीला गेले असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. तसंच, या प्रकरणी आमची कोणतीही तक्रार नसल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी कुटुंबाला समजही दिली होती. पोलिसांवरलसामाजिक दबाव वाढल्यानं पोलिसांचं एक पथक आळंदीला रवाना झालं होतं. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. सू मोटोने गजानन बुवा चिकणकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला सोमवारी रात्री ताब्यात घेतलं होतं.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times