मुंबई : राज्यात करोनाचा धोका काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. अशात आरोग्य व्यवस्था अपुरी पडताना दिसते. यामुळे पायाभूत सुविधा बळकट करण्यावर भर दिला जात असताना दुसरीकडे करोनाचा आधार घेत पैसे कमावण्याचे जीवघेणे प्रकार समोर येत आहेत. मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर असाच एक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशात कारवाई करत असताना करून बोगस औषध बनवणारे कंपनीच्या मालकाला बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी औषध कारखाना सील करून आरोपी संदीप मिश्राला अटक केली आहे. यापूर्वीही परतापुरात अवैध औषध कारखाना सील करण्यात आला होता. ही औषधे पंजाबमध्ये पुरविली जात होती. गेल्या वर्षी लिसाडिगेट पोलिसांनी उत्तराखंड ते मेरठ येथे बनावट औषधांचा पुरवठा करणारी अशी टोळी पकडली होती.

बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये मॅक्स रिलीफ हेल्थकेअर अशी कोणतीही औषध निर्माता कंपनी नसल्याचं तपासातून समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणी मालक सुदीप मुखर्जी याला पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणात संदीप मिश्रा हा एका खासगी प्रयोगशाळेत बोगस औषध बनवत असल्याचं समोर आलं. मिश्रा करोनावरील औषधी तयार करून मुखर्जीकडे पाठवायचा. मुखर्जी ही औषधी इतरांना विकायचा, अशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here