भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत ही टीका केली आहे. यावेळी त्यांनी ट्वीटमध्ये लिहलं की, ‘आज आलं अंगावर ढकललं केंद्रावरचा एपिसोड दिल्लीत. वसुलीत गर्क असल्यामुळे ठाकरे सरकारने आरक्षणाचा जो काही गुंता केलाय, तो सोडवा अशी विनंती पंतप्रधानांना करणार. झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही अशी राज्य सरकारची तऱ्हा. सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?’
इतकच नाही तर ट्विट करताना अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एक व्यंगचित्र शेअर केलं. यावर ‘उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय जावई घोषित करायला हवे, सतत केंद्राने हे दिले नाही ते दिले नाही म्हणून रडत असतात’ असं लिहण्यात आलं आहे.
दरम्यान, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ कोटी लशी एकरकमी चेक देऊन खरेदी करायला आपण तयार असल्याचे फेसबुकलाइव्हच्या माध्यमातून सांगितले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यानीच सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे १२ कोटी लस खरेदी करण्यासाठी लागणारे ७ हजार कोटी रुपये वाचले आहे. आता या रकमेतून गोरगरीबांसाठी पॅकेज जाहीर करावे अशी मागणी उपाध्ये यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times