पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीनंतर विविध राजकीय संदर्भ काढले जाण्यावरही राऊत यांनी भाष्य केले आहे. ज्यांना पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे राजकीय अर्थ काढायचे असतील त्यांनी ते काढावेत. मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष नसला पाहिजे. राज्यावर संकट आलेले असताना पंतप्रधांनी मदत करावी आणि राज्य आणि केंद्रात सुसंवाद असावा अशीच राज्याची भूमिका असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला काय सांगायचे आहे हे सुमारे १ तास ऐकून घेतले. ही चांगली गोष्ट असून संघर्षाची भाषा कशाला हवी, असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीनंतर आता राज्यातील अनेक प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
संजय राऊत यांनी राज्यातील भाजप नेत्यांच्या भूमिकेवरही भाष्य केले आहे. पंतप्रधान ठाकरे आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात व्यक्तीगत चर्चाही झाली असून आता भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे का,अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊत यांना विचारले असता राऊत म्हणाले की, आत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू असताना दोन खंबीर शिलेदार बाहेर होते असं सूचक वक्तव्य राऊत यांनी केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील ही भेट जेमतेम १० ते १५ मिनिटे चालेल असे बोलले जात होते. मात्र भाजप नेत्यांचे हे अंदाज चुकले असे सांगताना त्यांचे अंदाज नेहमीच चुकत आले आहेत, आताही ते चुकतील असा टोलाही राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times