मुंबई: अहमदाबादच्या भेटीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तेथील झोपडपट्टी दिसू नये म्हणून बांधण्यात येणाऱ्या भिंतीवरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून टोलेबाजी केल्यानंतर आता काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे. ‘गरिबीतून पुढं आल्याचं सांगणाऱ्या मोदींना गरिबीची एवढी लाज का वाटावी,’ असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते यांनी केला आहे.

वाचा:

डोनाल्ड ट्रम्प हे चालू आठवड्याच्या शेवटी भारताचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अहमदाबादला भेट देणार आहेत. तिथं त्यांच्या स्वागतासाठी ‘केम छो ट्रम्प’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीच्या पार्श्वभूमीवर शहरात रंगरंगोटीची कामं सुरू आहेत. झोपड्यांसमोर भिंती उभारल्या जात आहेत. मोदी सरकारचं हे कृत्य अमानवी असल्याचं असून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो, असं सावंत यांनी म्हटलं आहे. ‘गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ११ वर्षांत आपण देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त विकास केला असल्याचा ढोल याच नरेंद्र मोदी यांनी पिटले होते. पण त्यांचा गुजरात मॉडेल सपशेल खोटा आहे. सत्तेत असताना काही विकास केला असता तर अहमदाबादमधील गरिबांची ही वस्ती दिसलीच नसती. पण गरिबांसाठी काही केलेच नाही म्हणून तर लपवाछपवी करावी लागत आहे. अहमदाबादमधील गरिबांच्या झोपड्या ट्रम्प यांना दिसू नये यासाठी चालवलेला खटाटोप अत्यंत निंदनीय व लाजिरवाणा आहे. अमेरिकेतही गरिबी आहे, मग भारतातील गरिबीचे दर्शन ट्रम्प यांना झाले तर असा कोणता डोंगर कोसळणार आहे, असा प्रश्नही त्यांनी केला. ‘विकासपुरुष असल्याचा आव आणून बकाल शहरे व गरिबी हटवण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी केलेला हा घृणास्पद प्रकार आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here