म. टा. प्रतिनिधी,

करोना उपचारानंतरही सातत्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील प्रसिद्ध चांदी उद्योजक (वय ५५, रा मेन रोड, हुपरी) यांनी डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. शहरातील अनेक सेवाभावी संस्थेचे संचालक आणि सदस्य असलेल्या माळी यांच्या या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. ( from amol bajrang mali committed suicide by shooting himself in the head)

चांदी उद्योजक अमोल माळी हे वडील,पत्नी,मुलगा,सून आदी कुटुंबीयांसह नगरपालिकेच्या समोर राहत होते. हुपरी शहरात चांदी उद्योगात त्यांचे मोठे नाव आहे . चांदी रिफायनरी बरोबरच चांदीची चेन निर्मितीचा उद्योग मोठ्या प्रमाणात आहे.

पंधरा दिवसांपूर्वी माळी व त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना करोनाची बाधा झाली होती.व्हॉस्पिटलमध्ये उपचार करुन अमोल माळी हे दोनच दिवसांपूर्वी घरी परतले होते. त्यानंतरदेखील त्यांचा दम्याचा त्रास कमी होत नव्हता.त्यामुळे ते अस्वस्थ होते आपला हा आजार आता बरा होणार नाही, आपल्याला हा त्रास कायमचा सोसावा लागेल असे वाटून त्यांची मानसिकता बिघडली.

क्लिक करा आणि वाचा-
या सततच्या आजाराला कंटाळून माळी यांनी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी स्व-रक्षणासाठी घेतलेल्या रिव्हॉल्वर मधून डोक्याच्या उजव्या बाजूस गोळी झाडून घेतली.सकाळी सहा वाजता घरातील सदस्य उठवण्यासाठी गेले असता माळी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.

क्लिक करा आणि वाचा-
घटनास्थळी हुपरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह फॉरेन्सिक लॅब व ठसे तज्ज्ञांच्या पथकांनी पंचनामा केला.
दरम्यान, दिड महिन्यांपूर्वी चांदी उद्योजक सौरभ सुनील गाट यांनी आत्महत्या केली होती. यांच्यानंतर आज चांदी उद्योजक अमोल माळी यांनी परवाना असलेल्या रिव्हॉल्वरने आत्महत्या केल्याने चांदी उद्योगात खळबळ उडाली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here