आजच्या २९५ मृत्यूच्या आकड्याबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.७३ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५५ लाख ८० हजार ९२५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ६७ हजार ९२७
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ६७ हजार ९२७ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी तीत घट होताना दिसत आहे ही दिलासादायक बाब आहे. पुण्यात एकूण २० हजार ७४७ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १७ हजार ६४२ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १५ हजार ७२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ५५१ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७ हजार २०३ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ३६९ इतकी आहे.
या बरोबरच अहमदनगरमध्ये ५ हजार ९३७ इतकी आहे. औरंगाबादमध्ये २ हजार २१५, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार ५३७ इतकी आहे. जळगावमध्ये ३ हजार ०४१, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार ७१५ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या २ हजार ५१०, तर, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या पालघर जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ३१८ इतकी आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times