पुणे : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा () यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे. तसंच, त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळं राणा यांची खासदारकी धोक्यात आली असल्याची राजकीय चर्चा सध्या सुरू आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांना पुन्हा अभिनयात नशीब आजमावं अशी टीका केली आहे.

‘नवनीत राणा यांच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं.’ अशी टीका करत रुपाली चाकणकर यांनी एक व्हिडिओदेखील ट्वीट केला आहे.

व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर म्हणाल्या की, ‘अभिनयामध्ये रिटेक घेतला जातो पण आता अमरावतीकर पुन्हा रिटेकची संधी देणार नाही. नवनीत राणा यांनी खोटी प्रमाणपत्र सादर केली. नवनीत रामा रिल लाईफ आणि रिअल लाईफ यामध्ये फरक आहे. त्यामुळे आता तुम्ही राजीनामा देऊन पुन्हा अभिनयात आपलं नशीब आजमावून बघा’ असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राणा यांनी जात पडताळणी समितीसमोर दाखल केलेली मूळ कागदपत्रे सादर करण्याची मागणी यचिकाकर्त्यांनी केली होती. याचिकाकर्त्यांनी केलेली विनंती उच्च न्यायालयाने मान्य केली होती. मूळ कागदपत्रे पुढील सुनावणीपर्यंत सादर करण्याचा आदेश न्यायालयाने राणा यांना दिला होता.

या प्रकरणी आज पुढील सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयानं राणा याचं जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला. न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राणा यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे.

आनंदराव अडसूळ म्हणतात…
‘खोटं जात प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढवल्याबाबत आता नवनीत राणा यांच्या विरोधात तक्रार करणार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे,’ असं माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here