म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर

वादळाने वीज पुरवठा खंडित होणे, हवेच्या दाबाने पाइपलाइन फुटणे अशा नैसर्गिक कारणांमुळे अहमदनगरकरांना निर्जळी सहन करावी लागल्याचे प्रकार सतत घडतात. आज मात्र वेगळ्याच कारणामुळे ही वेळ आली आहे. मुळा धरण ते अहमदनगर शहर या मार्गावर नवीन पाइप लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. ते काम करणाऱ्या पोकलॅन यंत्राच्या चालकाच्या चुकीमुळे जुन्या मुख्य पाइपालाइनला धक्का लागला. त्यामुळे ती फुटली असून दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. (Ahmednagar will not get water for two days)

मंगळवारी दुपारी चार वाजता नांदगावजवळ ही घटना घडल्याची माहिती महापालिकेच्या पुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारीही नगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. अहमदनगर शहराला मुळा धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी जुनी ७०० एमएम पाइपलाईन आहे. ती अपुरी पडत असल्याने सरकारच्या अमृत योजनेतून नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. अहमदनगर मनमाड महामार्गाच्या बाजूने जुन्या पाइपलाइन शेजारूनच ही नवी पाइपलाईन टाकण्यात येत आहे. दुपारी चार वाजता नांदगाव येथे काम सुरू होते. त्यासाठी पोकलॅन यंत्राच्या सहाय्याने खोदाई करण्यात येत होती. यावेळी यंत्र चालकाचा अंदाज चुकला आणि जुन्या पाइपलाइनला धक्का लागला. त्यामुळे जुनी पाईपलाइन फुटली. त्यानंतर तातडीने पाणी उपसा बंद करण्यात आला आणि दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा-
अमृत योजनेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीसह महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत हे काम सुरू आहे. मात्र, दुरूस्तीसाठी आणि पुन्हा पाणी उपसा पूर्ववत करण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारनंतर पाणी पुरवठा होणाऱ्या नागापूर, बोल्हेगाव, पाईपलाईन रोड, व तसेच बुरूडगाव रोड, सारसनगर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर भागास पाणी मिळणार नाही.

क्लिक करा आणि वाचा-
याशिवाय बुधवारी ९ जूनला मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, सर्जेपुरा, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी या भागात उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here