सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या रजेचे पैसे काढून देण्यासाठी दहा हजार रुपयांची स्वीकारल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिकेच्या कनिष्ठ लिपिकाला रंगेहात पकडले. राजेंद्र शंकरराव गजभिये असे या आरोपीचे नाव असून तो मनपाच्या धरमपेठ झोन कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. ( caught a nagpur municipal corporation red-handed while accepting a )
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पारडी येथे राहणाऱ्या तक्रारदार महिलेचे पती धरमपेठ झोन कार्यालयात आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून कामाला होते. ३१ मार्च २०२१ला ते सेवानिवृत्त झाले. या महिलेचे पती सतत आजारी असल्याने त्याच्या निवृत्ती वेतनासंबंधीची कामे त्यांची पत्नी बघत होती. त्या माहिती घेण्यासाठी धरमपेठ झोन कार्यालयात गेल्या. सदर कामाची जबाबदारी वरिष्ठ लिपिक राजेंद्र गजभिये यांच्याकडे असल्याचे त्यांना कळाले. त्यांची गजभिये यांची भेट घेतली. निवृत्तीनंतरचे वेतन आणि सुट्यांच्या पैशाबाबत विचारणा केली.
क्लिक करा आणि वाचा-
यावेळी गजभिये याने सुट्यांचे पैसे काढून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली. या महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. पोलिस उपअधीक्षक योगीता चाफले आणि त्यांच्या चमुने मंगळवारी दुपारी सापळा रचला. तक्रारदार महिलेकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीने गजभिये यांना रंगेहात पकडले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times