मुंबई: मुंबईतील संसर्गाचा ग्राफ आणखी खाली आला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने ७ रुग्ण दगावले असून २८ मार्चनंतरची ही सर्वात कमी संख्या आहे. आज दिवसभरात ६७३ नवीन करोना बाधित रुग्णांची भर पडली आहे तर त्याचवेळी ७५१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान, मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १५ हजारांपर्यंत खाली आला आहे. ( )

वाचा:

गेल्या जवळपास दीड वर्षापासून करोनाच्या विळख्यात सापडली आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबईकरांना करोनाने बेजार करून टाकले. दुसऱ्या लाटेत करोनाचा उद्रेक सर्वाधिक राहिला. त्यातही करोना मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याने ती चिंता कायमच आहे. यात आजचा दिवस ही चिंता थोडीशी कमी करणारा ठरला. मुंबईत आज करोनाने ७ रुग्ण दगावले. ही सर्वात मोठी घट ठरली. २८ मार्चनंतर प्रथमच मृतांची संख्या इतकी खाली आली. मुंबईत करोनाने आतापर्यंत एकूण १५ हजार ७३ रुग्णांना प्राणास मुकावे लागले आहे.

वाचा:

मुंबईतील करोनाची आजची स्थिती

– मुंबईत आज ६७३ नवीन करोना बाधितांची नोंद.
– दिवसभरात ७५१ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.
– २४ तासांत करोनाने ७ रुग्ण दगावले. आतापर्यंत एकूण १५ हजार ७३ मृत्यू.
– सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ७३ पर्यंत आली खाली.
– शहर आणि उपनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के.
– वाढीचा दर ०.१२ टक्के तर रुग्णदुपटीचा कालावधी ५४३ दिवसांवर.
– आज दिवसभरात २६ हजार ९९२ करोना चाचण्या पूर्ण.
– झोपडपट्टी विभाग व चाळींमध्ये सध्या २७ सक्रिय .
– पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या ९८ इमारती आहेत सील.

जिल्ह्यात ३९४ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ३९४ नवीन करोना रुग्णांची वाढ झाली. यापैकी ठाणे शहरामध्ये ९५, कल्याण-डोंबिवली १०२, नवी मुंबई ४७, उल्हासनगर ७, भिवंडी ११, मिरा-भाईंदर ५८, अंबरनाथ १६, बदलापूर ९ आणि ठाणे ग्रामीणमध्ये ४९ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ५ लाख २२ हजार ४७७ इतकी झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यात ३६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यातील करोनाबळींची संख्या ९ हजार ५४९ वर गेली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here