फ्रान्सचे पंतप्रधान म्हणाले- हा लोकशाहीचा अपमान
मॅक्रॉन यांना कानाखाली लगावण्याच्या घटनेत सामील असलेल्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर फ्रान्सच्या अध्यक्षांवर झालेला हल्ला हा लोकशाहीचा अपमान असल्याचं फ्रान्सचे पंतप्रधान ज्यां कास्टेक्स यांनी म्हटलंय. दक्षिण-पूर्व फ्रान्समधील ड्रोम भागाच्या दौऱ्यासाठी मॅक्रॉन हे दाखल झाले. करोनाच्या संसर्ग आटोक्यात आल्यानंतर हॉटेल्स, आणि रेस्टॉरंट उघडण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांची विचारपूस करण्यासाठी हे रेस्टॉरंट्समध्येही गेले आणि विद्यार्थ्यांशी त्यांनी गप्पा मारल्या. यावेळी ही घटना घडली.
व्हिडिओत काय दिसतंय?
पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेले फ्रान्स अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे शुभचिंतकांना भेटण्यासाठी पुढे आले. यानंतर बिरिकेट्सच्या पलिकडे उभ्या असलेल्या हिरवा टी शर्ट, चश्मा आणि फेस मास्क घातलेल्या व्यक्तीने त्यांच्याशी हात मिळवला. यानंतर मॅक्रॉन हे बाजूल होत असताना त्या व्यक्तीने त्यांच्या कानाखाली मारली. या घटनेनंतर सुरक्षा सरक्षकांनी लगेचच त्या व्यक्तीला पकडलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times