केंद्र सरकारने राज्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. राज्यांनी या निर्णयाचे पालन करावे. निश्चित केलेल्या दरांबाबत रोज देखरेख ठेवली जावी. अधिक दर घेणाऱ्या खासगी कोविड लसीकरण केंद्रांवर कडक कारवाई करावी, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
करोनावरील लस खासगी हॉस्पिटल्समध्ये या किंमतीत मिळणार
> कोविशिल्ड – ७८० रुपये> कोवॅक्सिन – १४१० रुपये> स्पुतनिक व्ही – ११४५ रुपये
मोफत लस देणार, पंतप्रधान मोदींची घोषणा
पंतप्रधान मोदींनी सोमवारी देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना करोनावरील लस मोफत देण्याची घोषणा केली. ही लस २१ जूनपासून राज्यांमध्ये मोफत दिली जाईल. येत्या काही दिवसांत करोनावरील लसींचा पुरवठा वाढवला जाईल, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
खासगी हॉस्पिटल्सना देशातील लसींच्या एकूण उत्पादनापैकी २५ टक्के वाटा मिळणार आहे. यासाठी खासगी हॉस्पिटल्स थेट लस उत्पादक कंपन्यांकडून डोस विकत घेऊ शकतील. सरकारने खासगी हॉस्पिटल्सना यापूर्वीच परवानगी दिली होती. पण खासगी हॉस्पिटल्सना लसीच्या निश्चित किमतीवर १५० रुपयांहून अधिक सेवा शुल्क घेता येणार नाही, असं पंतप्रधान मोदींनी यावेळी स्पष्ट केलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times