मुंबईः ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी- भेट जशी राजशिष्टाचाराचा भाग होती. तशीच ती व्यक्तिगत नात्याचीही होती,’ असं सूचक विधान शिवसेनेनं केलं आहे. तसंच, ‘राजकीय मतभेद होणे म्हणजे व्यक्तिगत नाते सैल पडले असे होत नाही. पुन्हा व्यक्तिगत नात्यागोत्यात फक्त सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो. ही नाती शिवसेनेनं सांभाळली आहेत,’ असंही म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणासह राज्यातील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र. यावेळी उद्धव ठाकरे- यांच्याच स्वतंत्रपणे चर्चा झाली. यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या भेटीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे.

‘दिल्लीतील या भेटीवर यापुढे बराच काळ चर्चेला धुरळा उडत राहील. मुख्यमंत्र्यांची दिल्ली भेट राजकारणासाठी नव्हती. ज्यांना या भेटीत राजकारण दिसते ते धन्य होतं. पंतप्रधान- मुख्यमंत्री भेटीने महाराष्ट्राचे केंद्रातील प्रश्न मार्गी लागोत,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचाः

‘मराठा आरक्षणाचा सोक्षमोक्ष लावा हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी तडकाफडकी दिल्लीस पोहोचले. अजित पवार व अशोक चव्हाण यांना सोबत घेऊन गेले. महाराष्ट्राचे हे तीन प्रमुख नेते व पंतप्रधान मोदी यांच्यात चांगली सवा तास बैठक झाली. म्हणजे बैठकीत उभय बाजूंचा ‘मूड’ चांगलाच होता व खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली, याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. ‘मराठा आरक्षणा’चा वेगळा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यापासून महाराष्ट्रातील जातीय राजकारणास बहार आली आहे,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

वाचाः

‘मराठा आरक्षणाबाबत काही पुढारी मुंबईत बसून लोकांची डोकी भडकवीत आहेत. हे सर्व उद्योग महाराष्ट्रात सुरू असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट दिल्लीच गाठली व मोदींनाच सांगितले, ‘मराठा आरक्षणाचा तिढा सोडवा’. मात्र त्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांची गोची झाली आहे.महाराष्ट्र हिताच्या बाबतीत उद्धव ठाकरे हे कुणाचीही व कसलीही भीडभाड ठेवणारे नेते नाहीत. महाराष्ट्राच्या वाट्याचे व हक्काचे जे काही आहे ते मिळायलाच हवे, असे ठोकून सांगणाऱ्यांपैकी सध्याचे मुख्यमंत्री आहेत,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here