मंगळवारपासून मुंबईसह, ठाणे, पालघर परिसरात पावसानं हजेरी लावली होती. बुधवारीही मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा अंदाज खरा ठरत मुंबई, उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे.
मान्सूनची मुंबईत एन्ट्री होताच पहिल्याच पावसात सखल भागात पाणी साचले आहे. सायन, कांजूरमार्ग परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव भागात रात्रीपासूनच पावसानं जोर धरला आहे. किग्ज सर्क, सायन, लालबाग- परळ व दक्षिण मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळं येथील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
वाचाः
पुढचे चार दिवस महत्त्वाचे
मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतर पुढचे चार दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळं पुढील चार दिवस पावसाची परिस्थिती अशीच राहिल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वाचाः
ठाणे, पालघरमध्येही संततधार
मुंबई उपनगरासह ठाणे, कल्याण, वसई व पालघर परिसरातही रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. रायगड जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times