मुंबईः मान्सूनचं आज मुंबईत आगमन झाल्यानंतर मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात सायन, किंग्ज सर्कल परिसरात पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळं मुंबई रेल्वेलाही () फटका बसला आहे. ()

मुंबई लोकल बंद असल्यानं नोकरदार वर्गानं रस्ते वाहतूकीचा पर्याय निवडला आहे. त्यामुळं पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. दृष्यमानता कमी झाल्यानं महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

– सायन- कुर्ला रेल्वे स्थानकांत पाणी साचले; मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-कुर्ला स्थानकादरम्यानची अप दिशेची वाहतूक बंद

– गांधी मार्केटपरिसरात पाणी साचले; वाहतुकीवर परिणाम

– मुंबईः मध्य रेल्वेची वाहतून धिम्या गतीने सुरु

– मुंबईः सायन, कुर्ला रेल्वे स्थानकात पाणी साचले

– मुंबईः पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या रांगा

– ठाणे, पालघर परिसरात पावसाचा जोर कायम, ठाण्यात सकाळी ८ पर्यंत २२. ६१ मिमि पावसाची नोंद

– मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

– मान्सून एक दिवस आधीच मुंबईत दाखल; हवामान विभागाची माहिती

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here