अहमदनगर: तालुक्यात बेलापूरजवळ नदीपात्रात एकाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या चौकशीत तो पढेगाव (ता. श्रीरामपूर) येथील भाजी विक्रेता शंकर उत्तम गलांडे (वय ३१) याचा असल्याची माहिती मिळाली. भाजीच्या पिशव्यांसह त्याची दुचाकी तेथे आढळून आली असून त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो घरी आला नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

वाचा:

बेलापूर येथी प्रवरा नदीच्या पुलावर एक दुचाकी उभी असल्याचे आणि नदी पात्रात एक मृतदेह तरंगत असल्याचे तेथील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली. उपसरपंच अभिषेक खंडागळे हेही तेथे आले. पोलिसांनी तेथे येऊन चौकशी सुरू केली. दुचाकी आणि मृतदेह यांचा काहीतरी संबंध असल्याचा संशय आल्याने दुचाकीची तपासणी करण्यात आली. दुचाकीला भाजीच्या पिशव्या अडकविण्यात आलेल्या होत्या. त्यातील भाजी खराब झालेली होती. तराजू आणि एक डायरीही त्यात सापडली. त्यावरून ही दुचाकी भाजी विक्रेत्याची असल्याचा अंदाज बांधून पोलिसांनी तपास सुरू केला. त्या आधारे त्या अनोळखी मृतदेहाची माहिती मिळते का, याची चाचपणी सुरू झाली. एमएच १७ ए. ५१९८ या दुचाकीच्या अनुषंगाने तपास सुरू झाला. दुचाकीला अडकविलेल्या पिशवीत एक डायरी होती. त्यावर शंकर उत्तम गलांडे असे नाव होते. त्याच नावाच्या व्यक्तीचे ओळखपत्रही होते. याशिवाय काही फोन नंबर लिहिले होते. पोलिसांनी त्यावर संपर्क करून विचारपूस सुरू केली. त्यातून त्याच्या घरच्या लोकांशी संपर्क झाला. त्यांनी शंकर गलांडे भाजी विक्रेता असून तीन दिवसांपासून घरी आला नसल्याचे सांगितले. तोपर्यंत नदी पात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. नातेवाईंकांनी त्याची ओळख पटविली. मृतदेह आणि दुचाकी शंकर उत्तम गलांडे यांचीच असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, नदीपात्रात त्यांचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, त्यासंबंधी कोणतीही चिठ्ठी तेथे आढळून आलेली नाही. त्यामुळे आत्महत्या केली असली तरी ती कोणत्या कारणातून झाली, हेही अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह तपासणीसाठी सरकारी रुग्णालयाच पाठविण्यात आला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here