राज्यात सध्या पुन्हा निवडणूक घ्या यावरुन नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. सोमय्यांनीही यावरच भाष्य केलं होतं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक घेण्याचं आव्हान दिलं, ज्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. याचाच धागा पकडत किरीट सोमय्या यांनी काँग्रेसचे प्रवक्त सचिन सावंत आणि राजीव सातव यांना टॅग करत ट्वीट केलं.
सोमय्या म्हणाले, ‘@sachin_inc (सचिन सावंत) @SATAVRAJEEV (राजीव सातव) भाऊ, शिवसेनानी विधानसभा निवडणुक नरेंद्र मोदींचा नावांनी लढवली! काँग्रेस/राष्ट्रवादीने युत्तीचा विरोधात निवडणूक लढवली! तुम्हाला अजित पवार ना काही प्रश्न विचारायचे असेल तर त्यांनाच विचारा… म्हणून @Dev_Fadnavis म्हणतात पुन्हा विधानसभा निवडणुका घ्या..’. याच ट्वीटवर राजीव सातव यांनी टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
?
‘हिंमत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा’, असं खुलं आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिलं. सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या, असं फडणवीस म्हणाले. ते नवी मुंबईत भाजपच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात बोलत होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times