मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल या नेहमीच्या परिसरात सखल भागात पाणी साचल्यानं मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. यावरुन विरोधकांनी महापालिकेला लक्ष्य करत नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
वाचाः
‘अंधेरी सबवे व हिंदमाता हे नेहमीच पाण्याखाली जाणारे परिसर आहेत. पण मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस, हायटाईट यामुळं पाणी तुंबलंय. चार तासांच्यावर पाणी शहरात थांबत नाही. त्यामुळं थोड थांबणं गरजेचं आहे,’ असंही त्या म्हणाल्या आहेत.
वाचाः
‘या आधी मुंबई दोन दोन दिवस, चार चार दिवस पाणी भरल्यानंतर ठप्प व्हायची. मात्र आता ती परिस्थिती नाही. आम्ही आत्ताच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जिथे निष्काळजीपणा दिसेल, तिथे कारवाई होईल,’ असं महापौरांनी म्हटलं आहे. तसंच, ‘हिंदमाताचा भूमिगत प्रकल्प मनुष्यबळामुळं त्या प्रकल्पात अडथळे येत आहेत. पण ही कारणं आम्ही देणार नाहीत,’ असंही त्या म्हणाल्या.
भाजपनं केली होती टीका
पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. १०४ टक्के गाळ काढल्याचा दावा केला गेला पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला. १०० कोटींचं टार्गेट असणारा एक सचिन वाझे सापडला पण असे सचिन वाझे ठिकठिकाणी असल्यावर सर्वसामान्य मुंबईकरांच्या नशिबी तुंबलेली मुंबई, अशी टीका भाजप नेते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times