मुंबई: ‘करोनाचा विषाणू हा समाजाचा सध्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. तो आपल्या घरात, परिसरात घुसून बसला आहे. त्यानं अनेकांना जखडून ठेवलं आहे. अशा या शत्रूवर ” करण्याचा दृष्टिकोन केंद्र सरकारनं ठेवायला हवा,’ असं मत मुंबई उच्च न्यायालयानं आज व्यक्त केलं. ( on )

घरोघरी लसीकरणाची मागणी करत अॅड. धृती कपाडिया व अॅड. कृणाल तिवारी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर, घरोघरी लसीकरण हे धोरण सध्या परिस्थितीत व्यवहार्य नाही. त्याऐवजी घराजवळ लसीकरणाचं धोरण आम्ही अवलंबलं आहे, अशी भूमिका केंद्र सरकारनं काल मांडली होती. या प्रकरणावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्त व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढं आज पुढील सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं केंद्र सरकारला परखड शब्दांत फटकारलं. ‘घराजवळ लसीकरण हे केंद्र सरकारचं धोरण म्हणजे विषाणूनं कोविड केंद्रावर येण्याची वाट पाहण्यासारखं आहे. करोना व्हायरस हा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याच्यावर हल्ला चढवला पाहिजे. हा शत्रू आपल्या घरात घुसला आहे. आपल्यातील काहींना त्यानं घेरलं आहे. लोकांचं बाहेर पडणं कठीण करून टाकलं आहे. त्यामुळं त्याच्यावर सर्जिकल स्ट्राइक करण्याचा विचार केंद्र सरकारनं करायला हवा. मात्र, सरकार शत्रूवर हल्ला न करता सीमेवर उभे राहून विषाणू घरातून बाहेर पडण्याची वाट बघते आहे,’ असं खंडपीठानं सुनावलं.

वाचा:

‘केंद्र सरकार जनहिताचे निर्णय घेते आहे हे खरे असले तरी ते निर्णय घेण्यात विलंब होत आहे. लसीकरणाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यास उशीर झाला नसता तर अनेकांचे प्राण वाचले असते,’ याकडं न्यायालयानं लक्ष वेधलं.

केरळ राज्यात घरोघरी लसीकरणांची मोहीम यशस्वीरित्या सुरू आहे. रांची, जम्मू-काश्मीर व वसई-विरार महापालिकाही घरोघरी लसीकरण मोहीम राबवत असल्याचं अॅड. धृती कपाडिया यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणलं. त्यावर, केरळ राज्यात ही मोहीम यशस्वी होत असेल तर इतर राज्यांत आणि देशभरात का राबवली जात नाही,’ असं सवाल न्यायालयानं केला.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here