शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोरदेखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यामुळे कोर्टात हा निकाल दिला. अमरावती जिल्हात शिवसेनेचे वतीने जल्लोष केल्याने दुसरीकडे नवनीत राणा यांच्या समर्थकांनमध्ये सन्नाटा पसरला आहे
क्लिक करा आणि वाचा-
अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीने जल्लोष केल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे नवनीत राणा यांच्या समर्थकांमध्ये मात्र सन्नाटा पसरला आहे. न्यायालयाच्या निकालाच्या दिवशी खासदार नवनीत राणा दिल्लीत तळ ठोकून होत्या. अशाप्रकारे जात पडताळणीची अनेक प्रकरणं प्रलंबित असताना अचानकपणे हा निकाल आल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. दोन वर्षापासून प्रलंबित असलेला निकाल न्यायालयाने दिल्यानंतर मात्र शिवसैनिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times