वाचा:
विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात राजकीय हालाचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच जितिन प्रसाद यांचा भाजप प्रवेश काँग्रेसच्या जिव्हारी लागलेला आहे. उत्तर प्रदेशच नव्हे तर देशातील काँग्रेस नेत्यांमधून यावर प्रतिक्रिया उमटत आहे. तांबे यांनीही शहा व प्रसाद यांच्या भेटीचे छायाचित्र ट्वीट केले आहे. त्यासोबत तांबे यांनी म्हटले आहे, ‘किती प्रतिकात्मक चित्र! हनुमानाने आपली छाती फाडली आणि श्रीरामप्रती निष्ठा दर्शविली. आणि तिथे जितिन प्रसाद पहा.’ असे ट्विट तांबे यांनी केले आहे.
वाचा:
आपल्या हृदयात श्रीराम आहेत, हे दाखवून देण्यासाठी हनुमानाने छाती फाडून दाखविली, अशी अख्यायिका आहे. स्वामीनिष्ठेसाठी हे उदाहरण दिले जाते. शहा यांच्या दालनात अशीच हनुमानाची मूर्ती आहे. त्या मूर्तीसमोरच काँग्रेसशी गद्दारी करून गेलेले जितिन बसले आहेत, याकडे लक्ष वेधत तांबे यांनी त्यांच्यावर ही टीका केली आहे. प्रसाद हे राहुल गांधी यांच्या अंत्यत जवळचे मानले जात होते. त्यामुळे त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून विरोधी पक्षात सामील होणे, काँग्रेसच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यामुळेच फोटोतील दृष्यावरून हनुमानाच्या स्वामीनिष्ठेचे उदाहरण देत तांबे यांनी प्रसाद यांच्यावर टीका केल्याचे दिसून येते. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वीही अशी फोडाफोडी झाली होती. आता तोच प्रकार उत्तर प्रदेशात होत असून काँग्रेसची निष्ठावान समजली जाणारी मंडळीच भाजपकडून गळाला लावली जात असल्याचे दिसून येते.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times