दुबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी टी-२० क्रिकेटमधील ताजी क्रमवारी जाहीर केली. ताज्या क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार याची घसरण झाली आहे. तर आणि यांनी स्थान कामय राखले आहे.

वाचा-
फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली १०व्या स्थानावर घसरला आहे. क्रमवारीत विराटचे ६७३ गुण असून तो एका स्थानाने खाली घसरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याने १०५ धावा केल्या होत्या. भारताचा केएल राहुल दुसऱ्या तर रोहित शर्मा ११ व्या स्थानावर कायम आहे.

वाचा-
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेनंतर आयसीसीने क्रमवारी जाहीर केली. मालिकेत इयान मॉर्गन याने दोन अर्धशतकासह १३६ धावा केल्या. तो क्रमवारीत ६६२ गुणांसह ९व्या स्थानावर पोहोचला. पाकिस्तानचा अझम बाबर ८७० गुणांसह क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.

वाचा-
आफ्रिकेचा डी कॉकला क्रमवारीत सर्वाधिक फायदा झाला. त्याच्या क्रमवारीत १० स्थानांनी वाढ होत तो १६व्या स्थानावर पोहोचला आहे.

गोलंदाजांमध्ये भारताचा जसप्रित बुमराह १२व्या स्थानावार आहे. आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी करणारा टॉम कुरेन २८ स्थानांच्या वाढीसह पहिल्या ३० मध्ये पोहोचला आहे. अष्ठपैलूंच्या यादीत राशिद खान आणि मोहम्मद नबी अव्वल स्थानावर आहेत.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here