जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या जीनसी गावाजवळ वीज पडून बैलगाडीवरुन जाणारे दहा जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमी जीनसी गावातीलच रहीवासी असून एकाच कुटुंबातील आहेत. (Ten members of the same family were injured in a lightning strike in Raver taluka)
जळगाव जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये मान्सूनच्या पावासाने हजेरी दिली. रावेर तालुक्यात देखील अनेक भागात आज बुधवारी दुपारी वीजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील जीनसी गावाच्या शेत शिवारात वीज पडली. वीज पडलेल्या ठिकाणाजवळूनच बैलगाडवरुन शेतातून परतत असलेले दहा ग्रामस्थ जखमी झालेत. जखमींना तातडीने रावेर येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालयात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी भेट देऊन जखमींची विचारपुस केली. १० जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.डी. महाजन यांनी माहिती दिली.
क्लिक करा आणि वाचा-
जखमींची नावे
१. बळीरामपवार (वय-२१),
२. दिलीप पवार (वय-२१),
३. अरविंद पवार (वय-१५),
४, ईश्वर दल्लू पवार (वय-१५),
५. कमलसिंग लक्ष्मण पवार (वय-२०),
६. अनिल लक्ष्मण पवार (वय-२७),
७. बिंदुबाईल लक्ष्मण पवार (वय-५०),
८. साईराम मोरसिंग पवार (वय-३७),
९. मलखान मोरसिंग पवार (वय-४५)
१०. लक्ष्मण मोरसिंग पवार (वय-५५)
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times