: ‘नव्या नेतृत्वाखाली ‘गोकुळ’ आणखी बहरत जावो, अजून मला बहरलेला पाहायचा आहे. त्यामुळे दूध उत्पादकांच्या उन्नतीचे नवनवीन पाऊल गोकुळने टाकावे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी चेअरमन विश्वास पाटील आणि संचालकांना कानमंत्र दिला.

‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर चेअरमन विश्वास पाटील आणि संचालक मंडळाने बुधवारी राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री पवार यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित होते. पवार यांनी गोकुळचे चेअरमन पाटील व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्यासोबत दुग्ध उत्पादन व व्यवसाय, दूध संघाची वाटचाल यासंबंधी चर्चा केली.

‘गोकुळ’च्या उत्कृष्ट कामकाजाविषयी पवारांनी कौतुकोद्गार काढले. ‘गोकुळने ग्रामीण भागाची आर्थिक उन्नती चांगल्या प्रकारे केली. कोल्हापूर जिल्ह्याला दुग्ध व्यवसायामुळे कोल्हापूर जिल्ह्याला समृद्धी प्राप्त झाली. गोकुळ हे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक उन्नतीचे पुढचं पाऊल असेल,’असे पवार यांनी नमूद केले. यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, मुंबई शाखेचे शाखाप्रमुख दयानंद पाटील उपस्थित होते.

दरम्यान, नूतन संचालक मंडळाने दुग्धविकासमंत्री सुनील केदार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचीही भेट घेतली.

जुन्या गोष्टींना उजाळा अन् मदतीची ग्वाही
चर्चेदरम्यान शरद पवार यांनी दूध संघाला मुंबईमध्ये दूध विक्री करण्यासाठी परवानगी तसंच कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क येथील शासकीय डेअरीची जागा दूध संघास मिळवून दिली होती या जुन्या गोष्टींना उजाळा दिला. येथून पुढे संघास मार्गदर्शनाची गरज लागल्यास सर्वतोपरी मदत करू, असं आश्वासनही पवार यांनी दिलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here