जळगाव: शेतातून घरी परतत असताना अंगावर वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील तालुक्यात असलेल्या तळई गावात बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास काही वेळाच्या अंतराने या दोन दुर्दैवी घटना घडल्या. मृतांमध्ये तरुणासह प्रौढाचा समावेश आहे. (वय १८) आणि (वय ५७) अशी मृतांची नावे आहे. दोघेही मृत तळई गावातील रहिवासी होते. ( )

वाचा:

विक्रम चौधरी व भूषण पाटील हे दोघे जण शेतात गेलेले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तळई शिवारात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ते घरी परत येत होते. त्याचवेळी अंगावर वीज पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या. त्यामुळे तळई गावावर शोककळा पसरली आहे. भूषणच्या अंगावर वीज पडल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला तत्काळ एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

वाचा:

तालुक्यात वीज पडून दहा जखमी

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातही वीज कोसळून दहा जण जखमी झाले. जीनसी गावाजवळ ही दुर्घटना घडली. बैलगाडीवरुन जाणारे दहा जण वीज कोसळल्याने जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वजण जीनसी गावातील एकाच कुटुंबातील आहेत. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी तिथे भेट देऊन जखमींची विचारपूस केली. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. डी. महाजन यांनी माहिती दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here