जितीन प्रसाद यांच्या भाजप प्रवेशाला खरगे यांनी फार महत्त्व दिलं नाही. जाणारे जातच असतात, आम्ही त्यांना रोखू शकत नाही. हा त्यांचा निर्णय आहे, त्यांचे भवितव्य काँग्रेसमध्येच चांगले राहिले असते. जे काही आहे, ते दुर्दैवी आहे, असं खर्गे म्हणाले.
ज्योतिरादित्य शिंदेंनंतर काँग्रेसला मोठा झटकाः बिश्नोई
दुसरीकडे, काँग्रेसचे मोठे नेते कुलदीप बिश्नोई यांनी हा पक्षाला मोठा झटका असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. राज्यांमध्ये विजय मिळवण्यासाठी पक्षाने लोक नेत्यांना ओळखून त्यांना बळ दिले पाहिजे, असं बिश्नोई म्हणाले. आधी ज्योतिरादित्य शिंदे… आणि आता जितीन प्रसाद… काँग्रेससाठी हा मोठा झटका आहे. कारण आपण अशा नेत्यांना गमावतोय ज्यांनी पक्षासाठी योगदान दिलं आणि ते पुढेही देऊ शकले असते, असं ट्वीट बिश्नोई यांनी केलं आहे.
‘प्रसादांना काँग्रेसची साथ सोडायला नको होती’
जितीन प्रसाद यांनी या कठीण प्रसंगी काँग्रेसची सोबत सोडायला नको होती. पण काँग्रेसला लोक नेते ओळखून त्यांना बळ दिलं पाहिजे. यामुळे राज्यांमध्ये पुन्हा विजय मिळवता येईल, असं ते म्हणाले.
काँग्रेसने त्यांना मोठं केलं, पद दिलं. पण त्यांनी संधीसाधू राजकारण केलं. जितीन प्रसाद सांगत होते की आपण ८ ते १० वर्षांपासून विचार करत होतो. मग तुम्ही मंत्री असतानाही हाच विचार करत होते का? प्रसाद यांनी जे केलं ते दुःख देणारं आहे. देशा करोनाच्या संकटाशी लढतो आहे आणि केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या चुकीच्या व्यवस्थापनाने बिकट स्थिती निर्माण झाली आहे. तरीही तुम्ही त्यांच्यासोबत जाण्याची चूक केली. त्यांच्यासोबत राहून तुम्हाला चांगलं वाटतंय का? असा सवाल करत काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी जितीन प्रसाद यांच्यावर हल्लाबोल केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times