या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार निरंजन बोहरा असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. तर, शंशाक केशवराव हिवसे (४५, रा. प्रभात कॉलनी, अमरावती) असे तक्रारदार अडत्यांचे नाव आहे. बोहराकडे बाजार समितीकडून मिळालेला धान्य खरेदीचा परवाना आहे. रिद्धी ट्रेडर्स नावाने बाेहराची फर्म आहे. बोहराचे बाजार समितीच्या इमारत ‘क’ मध्ये कार्यालय आहे. याच ठिकाणाहून त्यांचे सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार चालत होते.
दरम्यान मागील चार ते पाच महिन्यांपासून बाेहराने बाजारातील अनेक अडत्यांकडून मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी केले. मात्र या मालाची पुर्ण रक्कम अडत्यांना दिली नसल्याचा आरोप २० ते २२ अडत्यांनी बाजार समितीकडे एप्रिल महिन्यात तक्रारीद्वारे केली होती.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान हिवसे यांनी पोलिसात तक्रार दिली असून, बोहराने सुरुवातीला आपण दिलेल्या मालाची रक्कम दिली मात्र १९ लाख ७९ हजार ७४८ रुपयांनी आपली फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बोहराकडून अजूनही काही व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times