मुंबई: पावसाने आपल्या आगमनासोबतत तडाखा देत मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवून दिली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आणि मुंबईची तुंबई झाली. मात्र मुंबईच्या तुंबईवरून विरोधकांकडून महाविकास आघाडीवर टीकेची झोड देखील उठलेली पाहायला मिळत आहे. भाजप नेत्या यांनी पावसावर कविता करत मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आहे. (bjp leader criticizes regarding water logging in mumbai after heavy rain)

चित्रा वाघ यांनी आपली कविता ट्विट केली आहे. मुबईत पाऊस पडल्यानंतर मुंबई पाण्याचे भरली आहे. अशा अवस्थेत मात्र घरी बसले आहेत. अशा परिस्थिती ही जबाबदारी कोणाची असा प्रश्न जनता विचारत असल्याचे चित्रा वाघ यांनी विचारले आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘पावसाच्या येता सरी… मुंबई पाण्याने भरी… मुख्यमंत्री बसले घरी… मुंबईची जनता विचारी… ‘ही’ कुणाची जबाबदारी ?’

दरम्यान मुंबईत आज पहिल्याच पावसात सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता अशा सखल भागात नेहमी प्रमाणेच पावसाचे पाणी साचले. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं होते. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

क्लिक करा आणि वाचा-
संततधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलसेवेलाही मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी भरले होते. काल दिवसभरात दादर ते अंधेरी या पट्ट्यात ३०० मिलीमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद झाली.

क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म पालिका नियंत्रण कक्षात जाऊन मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला. हवामान विभागाने ९ ते १५ जून या दरम्यान मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे पुढचे किमान पाच दिवस सतर्कता बाळगावी लागणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here